उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा!

महाड : किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाची राजधानी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली.


दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याकरिता लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमीत्ताने छत्रपती उदयन राजे यांनी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत झाले पाहीजे हे देखील सांगितले. आम्ही मावळे आहोत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी पंतप्रधान मोदींकडे जाऊ आणि महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्ली येथे झाले पाहिजे ही भावना निश्चित पूर्ण करू असे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.


पुढे बोलताना, राज्यातील प्रत्येक प्रमुख सहा शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित उद्याने ५०-५० कोटी रुपये खर्च करून तयार करणार आहोत. त्याच सोबत भरत गोगावले यांची शिवसृष्टीची मागणी आहे. त्याला देखील मी समर्थन देतो आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यासाठी शिफारस करतो असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा