TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक
बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा परिषदेची माहिती


महाराष्ट्र : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (TET) महिला उमेदवारांना बुरखा, दुपट्टा किंवा ओढणी परिधान करण्याचे स्वातंत्र्य राहील. मात्र परिक्षा सुरू असताना वर्गखोलीत उमेदवाराचा चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक असेल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.




महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेतर्फे येत्या २८ जूनला शिक्षक पात्रता (TET) परीक्षा घेतली जाणार आहे. गेल्या काही काळापासून परिक्षांमधील वाढते गैरप्रकार आणि डमी उमेदवारांचे रॅकेट पाहता परिक्षा परिषदेने यंदा सर्व परीक्षा केंद्रांवर 'लाइव्ह सीसीटीव्ही यंत्रणा' कार्यान्वित केली आहे. अशा स्थितीत चेहरा झाकलेल्या उमेदवारांमुळे ओळख पटवणे अशक्य होते. डॉ. बेडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ओळख आणि बायोमेट्रिक पडताळणीसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये उमेदवाराचा चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक आहे.



उच्च न्यायालयाच्या निरीक्षणांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, यूपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन अशा विविध परीक्षांमध्येही चेहरा झाकण्याला प्रतिबंध करण्यात आला आहे.



गेल्या काही वर्षांपासून परिक्षांमध्ये कानात अतिशय लहान आकाराचे ब्लूटूथ किंवा वायफाय इअरफोन वापरून कॉपी करण्याचे प्रकार वाढले आहेत. तोंड झाकलेले असल्यास आतल्या आत कोण एकमेकांशी बोलत आहे हे देखील समजणे कठीण होते. गैरप्रकार टाळण्यासाठीच सर्व उमेदवारांचा चेहरा, मान, तोंड आणि कान स्पष्ट दिसणे गरजेचे असल्याचे परिक्षा परिषदेने म्हटले

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व