धरणांची जलपातळी घटली! पाणीकपातीचे संकट!

मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठा १०.७५ टक्क्यांवर तर राज्यातल्या सुमारे तीन हजार धरणांमधील पाणीसाठा २९ टक्क्यांवर


मुंबई : मुंबईसह राज्यात तापमानाचा पारा चढाच असून उकाडा कायम आहे. त्यातच मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणांतील पाणीसाठा दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत चालला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठा १०.७५ टक्क्यांवर आला आहे. तर राज्यातल्या सुमारे तीन हजार धरणांमधील पाणीसाठा २९ टक्क्यांवर आला आहे.


मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशांवर स्थिर आहे. शहरातील आर्द्रता मात्र अधिक आहे. परिणामी उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मान्सून दाखल होईपर्यंत नागरिकांना अशाच काहीशा तापदायक वातावरणाला सामोरे जावे लागणार आहे. जास्त उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन ही मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे देखील पाण्याच्या साठ्यात मोठी घट होत आहे.


राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी मुंबई आणि परिसर मात्र कोरडाच आहे. यामुळे पाऊस आणखी रखडल्यास जून महिन्यात मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातून अधिकचे पाणी मिळावे यासाठी महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारला पत्र लिहिले होते.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी मध्य वैतरणा या धरणात १०.७५ टक्के, तर वैतरणा धरणात २९.९१ टक्के, भातसा धरणात ३२.४८ टक्के, मोडक सागर धरणात ४७.९८ टक्के तर तानसा धरणात ३६.९९ टक्के पाणीपुरवठा सध्या उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या