निवडणूक आयोगाची शिक्षकांवर ‘छडी’

मुंबई : राज्यातील शाळांना मे महिन्याची सुट्टी लागली असल्यामुळे अनेक शिक्षक आपल्या हक्काच्या सुट्टीत गावी गेले आहेत. मात्र दुसरीकडे शिक्षकांना सुट्टी मिळाली तर निवडणुकीचे काम कोण करणार? असा सवाल उपस्थित करत प्रशासनाने शिक्षकांना मतदार नोंदणीच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनेक शिक्षक गावी असल्यामुळे निवडणूक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी समतानगर पोलीस ठाण्याला अर्ज देऊन फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या या हालचालीमुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये भीतीचे आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे.


शाळा सुरु असल्यामुळे शिक्षकांना वर्षभर सुट्ट्या घेणे शक्य होत नसते. मात्र मे महिन्यात शाळांना सुट्टी असल्यामुळे शिक्षक सुट्टी लागल्यावर लगेच आपापल्या गावी किंवा बाहेर कुठेतरी फिरवयास जाण्याची योजना बनवितात. अशी सर्व परिस्थिती असतांना पुढील काही दिवसांत लोकसभा, विधानसभा आणि पालिकेच्या निवडणुका येणार असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे मतदार नोंदणीबाबतची कामे करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज भासते आणि म्हणूनच शिक्षकांना ही मतदार नोंदणीची कामे सोपविण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

महानगरपालिकेच्‍या शालेय विद्यार्थ्यांना नौकानयन क्रीडा प्रशिक्षण

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : जपानमधील नागोया येथे होणाऱ्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतातील

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेचा एकच गट?

स्वीकृत नगरसेवकांसह समित्यांमधील बदलणार समिकरणे मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये

राज्यातील 'त्रिभाषा सूत्रा'साठी समितीला मुदतवाढ

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये 'त्रिभाषा धोरण' निश्चित करण्यासाठी

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई - भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व