मुंबई : आपल्या गृहनिर्माण प्रकल्पात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी विकासक वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप यांसारखी समाजमाध्यमे आणि विविध माध्यमांमार्फत आपल्या प्रकल्पाच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल जाहिराती करतात. या जाहिरातींमध्ये आता महारेराने काढलेल्या परिपत्रकानुसार एक गोष्ट बंधनकारक करण्यात आली आहे. कुठलेही माध्यम वापरुन केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये आता १ ऑगस्टपासून महारेरा क्रमांक आणि महारेरा वेबसाईटसोबतच क्यूआर कोडही ठळकपणे दर्शवणे, छापणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यासाठी सर्व नोंदणीकृत असलेल्या जुन्या प्रकल्पांना महारेराने प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोड द्यायला सुरुवात केली आहे. तसेच मार्च महिन्याच्या अखेरपासून नव्याने नोंदणी करणार्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांनाही नोंदणी पत्रासोबत महारेराकडून क्यूआर कोड देण्यात येत आहेत.
अनेकदा ग्राहकांना केवळ जाहिरातीतून प्रकल्पाविषयी संबंध तपशील मिळणे कठीण होते. मात्र क्यूआर कोडच्या सुविधेमुळे ग्राहकाला एका क्लिकवर संपूर्ण माहिती मिळवता येईल व निर्णय घेणे सोपे होईल. स्थावर मालमत्ता खरेदी करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. क्यूआर कोडमुळे सर्व प्राथमिक माहिती म्हणजेच प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी नोंदवला गेला व कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे, इमारतीमधील फ्लॅटची सद्यस्थिती, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत का, प्रकल्पाच्या विविध मंजुऱ्या, प्रकल्प सुरु झाल्यानंतर प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यात काही बदल केला का, प्रकल्पाच्या नोंदणीचे नूतनीकरण केले का, असा सर्व तपशील मिळेल.
याशिवाय, रेरा कायद्यातील तरतुदींनुसार, विकासकांना दर ३ व ६ महिन्यांनी त्यांच्या वेबसाइटवरील माहिती विविध स्वरूपात अपडेट करावी लागते. यामध्ये फॉर्म ५ हा अतिशय महत्वाचा फॉर्म असून दरवर्षी प्रकल्पाच्या वेबसाइटवर अपलोड करणे बंधनकारक आहे. यात या प्रकल्पाची सद्यस्थिती, एकूण खर्च आणि बाकीचे तपशील उपलब्ध होतात. हे सर्व आता क्यूआर कोडमुळे घरबसल्या सहज पाहता येणार आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…