पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा आणि लहान भाऊ कोण याबाबत जोरदार चर्चा रंगल्या असतानाच आता येऊ घातलेल्या पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी एक वक्तव्य केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही अजित पवार यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपावर भाष्य केले. पुणे लोकसभेची निवडणूक काँग्रेसच लढवेल, या थोरातांच्या वक्तव्यावर पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवेल, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
आज पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, पुणे लोकसभेची निवडणूक कोणत्या पक्षाने लढवायची, याचा अंतिम निर्णय महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते चर्चा करून घेतील. मात्र, पुण्यात राष्ट्रवादीची ताकद अधिक असल्याने ही जागा राष्ट्रवादीने लढवावी, अशी आमची इच्छा आहे. बाळासाहेब थोरात म्हणत असतील ही जागा काँग्रेस लढवेल. तर, मीही ठामपणे सांगतो की, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवेल. पुण्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, असं म्हणत पवारांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले आहे.
महाविकास आघाडीच्या जागांचे वाटप करताना पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली गेली पाहिजे, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे. सद्यस्थितीनुसार पुण्यात राष्ट्रवादीचेच आमदार-खासदार अधिक आहेत. काँग्रेसकडे याआधीपासून ही जागा होती मात्र मात्र ती काँग्रेसला जिंकता आली नाही. अजित पवार म्हणाले, एखाद्या मतदारसंघात एखाद्या पक्षाची जागा निवडून येण्याची शक्यता कमी असेल आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची ताकद तिथे जास्त असेल तर ती जागा मित्र पक्षाला दिली गेली पाहिजे. दुसरीकडे जर अशी उलट परिस्थिती असेल, तेव्हाही असे घडलं पाहिजे. जागांची अदलाबदलही करायला हवी.
दरम्यान काॅंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “खरं तर पुणे लोकसभेच्या जागेवर काॅंग्रेसचाच हक्क आहे. कसबा ही जागादेखील आम्ही किती वर्षांनी जिंकली? काॅंग्रेसची ताकद वाढली आहे असं मी म्हणत नाही. पण महाविकास आघाडी म्हणून लढायचं असेल तर आघाडीचा धर्म म्हणून आहे त्या जागेवर वाद घालण्यापेक्षा पुण्याची जागा काॅंग्रेसकडे होती, ती काॅंग्रेसकडे राहावी आणि काॅंग्रेसने लढावी असं मोठं मन सर्वांनी करुन सहकार्य करण्याची अपेक्षा आहे”, असं ते म्हणाले.
या वार पलटवारांमुळे आता पुण्याची जागा महाविकास आघाडीतल्या नेमकी कोणत्या पक्षाला मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…