प्रवाशांमध्ये होणारा गोंधळ टाळण्यासाठी 'हा' निर्णय

  160

मुंबई : दादर रेल्वे स्थानकात १५ प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यामध्ये ७ प्लॅटफॉर्म्स पश्चिम रेल्वेसाठी आहेत. या ७ पैकी दोन प्लॅटफॉर्म्स धीम्या उपनगरीय गाड्यांसाठी तर तीन प्लॅटफॉर्म्स जलद उपनगरीय गाड्यांसाठी आणि शेवटचे दोन प्लॅटफॉर्म्स हे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे टर्मिनस आहेत. उर्वरित ८ प्लॅटफॉर्म्स मध्य रेल्वेसाठी आहेत.


अनेक नियमित प्रवाशांना या गोष्टीची सवय झालेली असली तरी नव्या प्रवाशांचा मात्र सारख्या क्रमांकांमुळे मध्य व पश्चिम रेल्वेचे फलाट ओळखण्यात गोंधळ होतो. बर्‍याचदा ठाणे किंवा तत्सम बाजूला जायचं प्रयोजन असलेले प्रवासी गोंधळून पश्चिम रेल्वेच्या फलाट क्रमांक १ वर गाडीची वाट पाहत राहतात. तशीच परिस्थिती मध्य रेल्वेच्या बाजूसही पाहायला मिळते.


हा गोंधळ टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याअंतर्गत आता सर्व फलाटांना वेगवेगळे क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. दादरच्या मध्य व पश्चिम रेल्वेच्या फलाटांना आता सलग १ ते १५ असे क्रमांक देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांमध्ये होणारा गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई