बारावीत नापास झालेल्या पिंपरीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

पिंपरी : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवड येथील दापोडी परिसरात काल गुरुवारी दुपारी घडली. साक्षी राम कांबळे (वय १८, रा. गुलाबनगर, दापोडी. मूळगाव उमरगा), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती दापोडी येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तिने कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर बारावीचा निकाल पाहण्यासाठी जाते असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, दुपारी दोन वाजताच्या सुमारास ती पुन्हा घरी आली. नापास झाल्याचे तिने वडिलांना सांगितले. मात्र, वडिलांनी काही हरकत नाही पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दे, असे सांगितले. पण हे अपयश सहन न झाल्याने साक्षी वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत गेली आणि छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.


१५-२० मिनिटांनंतर तिची आई वरच्या खोलीत गेली असता साक्षीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आईने आरडाओरडा केल्यावर घरातील व शेजारी धावून आले. त्यांनी साक्षीला खाली उतरवत जवळच्या दवाखान्यात नेले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला