पुणे : पुण्यातील उंड्री चौकात एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावर रविवारी रात्री सव्वासात वाजता विचित्र भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स बसची पाच ते सहा गाड्यांना धडक बसली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर चौघे जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
पुण्यातील कोंढवा भाघात बस पुढे निघाली होती. अचानक या बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे समोर पाच ते सहा गाड्यांना धडक बसली. काही गाड्या पलटी झाल्या आहेत.
या अपघातात प्रशांत भानुदास घेमुड (वय ३७, रा. बधेनगर, कोंढवा खुर्द) आणि एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर, रिक्षाचालक मधू कुवर, रिक्षातील प्रवासी अलिस्टर मर्चंट, मालवाहतूक टेम्पोमधील इस्माईल सय्यद, रफिक देशमुख (रा. लेन क्रमांक ३, सय्यदनगर, हडपसर) हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
कोंढवा पोलिसांनी बसचालक आरोपी मैनुद्दीन मेहबूब शेख (वय ४२, रा. नाना पेठ, कॅम्प चौक, पुणे) याला ताब्यात घेतले आहे. ही मिनी बस द टाइम ट्रॅव्हल कंपनीच्या मालकीची आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावर ऑर्किड पॅलेससमोरील उतारावर वाय जंक्शनजवळ बसचा (क्रमांक एमएच १२- एचबी ०२४२) ब्रेक फेल झाला. त्यामुळे ही बस उतारावरून भरधाव सुटली. बसने समोरून येणाऱ्या सहा वाहनांना धडक दिली, त्यात एका वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…