उद्धव ठाकरे हेच दंगलीचे मास्टरमाईंड!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विविध ठिकाणी दंगलीच्या घटना घडताना पहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी नगर येथून सुरू झालेले दंगलीचे लोण आता हळूहळू राज्यभर पसरत आहे. दरम्यान, शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत दगडफेक झाली. त्यावरून ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर आरोप केला होता. त्यांनी केलेल्या आरोपाला भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार पलटवार करत उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. सध्या राज्यात ज्या काही दंगली होत आहेत, त्या दंगलीचा मास्टरमाईंड हे उद्धव ठाकरे आहेत, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.


नितेश राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, कालच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, दंगलीमागील सूत्रधार शोधा. मी अजित पवारांना सांगेन की या ज्या दंगली होत आहेत, त्याचा मास्टरमाईंड काही दिवसांपूर्वी तुमच्या सिल्व्हर ओकमध्ये आला होता. शरद पवार साहेबांच्या शेजारी बसला होता. कलानगर त्याचा पत्ता. मी वारंवार सांगतोय, २००४ मध्ये दंगल घडवून मुख्यमंत्री होण्याची इच्छा या सुप्त डोक्यातून बाहेर पडली. ती इच्छा आणि स्वप्न अजूनही मेलेले नाही. दंगली घडवून मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अजूनही जिवंत आहे. उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करा, हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. कारण १९९३ च्या दंगलीनंतर १९९५ मध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता आली, असे सांगणारे उद्धव ठाकरे २००४ मध्ये तसाच प्रयत्न करत होते. २००४ मध्ये झालेल्या बैठकीला माजी सरचिटणीस अरुण बेतकेकर उपस्थित होते. ते याची पुष्टी देऊ शकतात. उद्धव ठाकरे हे या दंगलीचे सूत्रधार आहेत का? याची चौकशी झाली पाहिजे, असे राणे यांनी सांगितले.


राणे म्हणाले की, ठाकरे गटातील अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोन नेते एकमेकांचे तोंडही पाहत नव्हते. आता त्यांचे सूर मिळायला लागले आहेत. ते आज पुन्हा एकत्र येत आहेत. ही दंगलीची योजना आहे का? मुस्लिम समाजात दंगली घडवून मते वाढवण्याचा उद्धवजींचा डाव पुन्हा एकदा घडत आहे का? पवारसाहेबांनी हे ओळखावे, असे राणे म्हणाले. त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने चादर फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते आग्रह करतात. महाराजांच्या गड किल्ल्यावर सर्वप्रथम अतिक्रमण सुरू केले. आता धार्मिक स्थळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. उद्याही घरात देखील येतील, असे राणे म्हणाले.


कर्नाटकात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. काँग्रेसचे खरे मनसुबे उघड झाले आहेत. त्यांना महत्त्वाचे खाते देण्याची काँग्रेसची बांधिलकी आहे. असाच प्रयत्न त्यांच्या धार्मिक स्थळावर झाला असता तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पेटला असता. हिंदू एकसंध नाहीत हे त्यांना माहीत आहे. हिंदू समाज झोपला आहे. ही शोकांतिका असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.


आम्हाला हिंदू समाजाचा पाठिंबा मिळायला हवा. कर्नाटकात जिहादी सत्तेवर आले आहेत. राज्यातही तेच चित्र रंगले. त्यासाठी रजा अकादमी, ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक झाली. चादर चढवणे, छत्रपतींच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याचे आदेश देणे हे पूर्व नियोजित केलेले षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली.

Comments
Add Comment

'लाडक्या बहिणी' भडकल्या! कारण काय?

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. लाडकी बहीण

पापलेट उत्पादनात घट का झाली?

मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तलावांचे नियमन - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मत्स्य

पुणेकरांनी लावली महामेट्रोची वाट! गुटखा-पानाच्या तुंबा-यांनी रंगल्या भिंती, जीने आणि गाड्या...

पुणे मेट्रोत हजारो लाइटर, किलोंनी तंबाखू, गुटखा जप्त पुणे : सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत