गाणी लावण्याच्या किरकोळ कारणावरुन नांदेडमध्ये दोन गटांत वाद

किनवट : अकोल्यातील हरिहरपेठ, नगरमधील शेवगाव आणि नाशिकमधील त्र्यंबकेश्वरनंतर आता नांदेडमध्येदेखील दंगलसदृश घटना घडली आहे. नांदेडमधील किनवट येथे हळदी समारंभात डीजे लावण्याच्या अत्यंत किरकोळ कारणावरुन दोन गटांत हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

१४ मे ला रात्री किनवटमधील गंगापूर येथे हळदी समारंभादरम्यान डीजे लावला होता. तेवढ्यात इस्लामपुरा येथील दहा जण तिथे आले. त्यांनी गाणी वाजवण्यावर आक्षेप घेतला व डीजे बंद करायला सांगितला. डीजे लावणार्‍यांनी नकार दिल्यामुळे या दोन्ही गटांमध्ये दगडफेक व हाणामारी सुरु झाली. हे प्रकरण एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत गेले. किनवट पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

यासंबंधी पोलिसांनी एका गटातील ७ तर दुसर्‍या गटातील ४ अशा ११ जणांना ताब्यात घेतलं आहे. दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता परिस्थिती निवळली असून कोणीही अफवा पसरवू नये व शांतता भंग न करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक