घरकुल बांधकामाच्या मजुरीपासून लाभार्थी वंचित

  349

मोखाडा (वार्ताहर) : सर्वांना हक्काचे व पक्कं घर बांधून मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत असून, या योजनेच्या माध्यमातून घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांला १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान व २० हजार रुपये स्वत:च्या घरकुल बांधकामावर रोजगार हमी योजनेतून मजुरी दिली जाते; परंतु जिल्हा ग्रामीण विकास विभागाचे अधिकारी पाटील यांच्या अनास्थेमुळे तालुक्यातील जवळपास पन्नास लाभार्थ्यांना हक्काच्या मजुरीचे पैसे मिळालेले नाहीत.



तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांतील आदिवासी कुटुंबे आजही गरीब परिस्थितीमुळे राहण्यासाठी हक्काचे पक्कं घर बांधू शकलेले नाहीत, त्यामुळे या आदिवासी कुटुंबांना हक्काची पक्की घरे मिळावीत यासाठी शासन स्तरावर पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई घरकुल योजना आदी घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. या घरकुल बांधकामासाठी खर्च दिला जातो, जेणेकरून घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध होईल व स्थलांतरास काही प्रमाणात आळा बसेल़ या चांगल्या हेतूने ही पंतप्रधान आवास योजना मोखाडा तालुक्यात राबविली जात आहे, परंतु याच घरकुल योजनेला पालघर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची नजर लागल्याने अनेक घरकुल योजनेचे लाभार्थी घरकुलाचा शेवटचा हप्ता व रोजगार हमी योजनेतून मिळणारी मजुरी मिळण्यापासून गेल्या चार ते पाच महिन्यांपासून वंचित राहिले आहेत.



घरकुल बांधकामावर रोजगार हमी योजनेतून काम केल्याचा वर्क कोड दिसत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यांवर घरकुलाचा शेवटचा हप्ता व मजुरीचे अनुदान जमा करता येत नसल्याचे प्राथमिक कारण पुढे आले आहे. परंतु पावसाळा सुरू होण्यास काही आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिला असून, पावसाळ्यापूर्वी घरकुलाचे काम पूर्ण होणार नसल्याने घरकुल लाभार्थ्यांकडून जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी धनंजय पाटील यांच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे.



याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी धनंजय पाटील यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.



घरकुलाचा शेवटचा हप्ता व रोजगार हमी योजनेची मजुरी मिळावी यासाठी मी डिसेंबर महिन्यापासून पालघर जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे. उद्या जमा होतील...परवा होतील... अशी उत्तरे जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी धनंजय पाटील हे गेल्या चार महिन्यांपासून देत आहेत, परंतु आजपर्यंत मला पैसे मिळालेले नाहीत. पावसाळा तर काही आठवड्यांवर आला आहे, जर अनुदानाचे पैसे मिळाले नाहीतर आम्ही करायचं काय?
- जयराम वाघ, (घरकुल लाभार्थी पोशेरा)

Comments
Add Comment

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना

आठ पंचायत समित्यांचीही अधिसूचना प्रसिद्ध पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

माजी आयुक्तांसह चौघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात ६ दिवसाच्या 'ईडी' कोठडीत असलेले पालिकेचे

विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,