बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


मुंबई : विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाचे प्रधान सचिव, अपर पोलिस महासंचालक वाहतूक रविंद्र सिंघल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आदी यावेळी उपस्थित होते.


बेदरकारपणे तसेच मद्य सेवन करून निष्काळजीपणे वाहन चालिवण्यामुळे अपघात आणि त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा मृत्यू यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०२१ मध्ये अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या २० हजार ८६० आहे तर त्यात ९८२९ जणांचा मृत्यू झाला आहे.


गृह विभागाच्या यासंदर्भात सार्वजनिक रस्त्यांवर बेदरकारपणे वाहन चालविणे हा अजामिनपात्र गुन्हा करण्याबाबतच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली. सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात आणि त्यात प्रवाशांचा होणारा मृत्यू यासाठी वाहनाचालकांविरुद्ध प्रभावी कारवाई होण्यासाठी कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठी यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करावी. विनापरवाना वाहन चालविणारे तसेच मद्यपी वाहनचालकांना त्याच्या कक्षेत आणावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग यावरील अपघात रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपायोजनांची माहिती घेतली. मुंबई- पुणे महामार्गावर असलेल्या उतारावरील ठिकाणी अपघात टाळण्यासाठी सुचना फलकांसोबतच रंब्लर बसविणे यासारख्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पालखी महामार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा

सोलापूर : सोलापूर जिल्हा (Solapur News) हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा गाभारा मानला जातो. येथे श्री विठ्ठल

Mumbai To Alibaug Ferry : अलिबागचा प्लॅन करताय? जरा थांबा! मुंबई-मांडवा बोट सेवा 'या' तारखेपासून होणार बंद

मुंबई : मुंबईकरांचे सर्वात जवळचे आणि आवडते वीकेंड डेस्टिनेशन असणाऱ्या अलिबागला भेट देण्याचा बेत आखणाऱ्यांसाठी

Pune Hadapsar News : मोठी बातमी! अखेर हडपसर रुग्णालय बॉम्ब प्रकरणातील आरोपीचा चेहरा समोर; दहशतवादाचा अँगल ?

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरामध्ये एका खासगी रुग्णालयात जिवंत बॉम्ब (IED) सापडल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती.

Uday Samant : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच परांजपे यांचा शिवसेनेत प्रवेश - उदय सामंत

मुंबई : माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश हा

NEET Exam 2026 : पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; NEET परीक्षा आता ‘या’ दिवशी होणार!

मुंबई : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून नीट परीक्षा २०२६ ची (NEET 2026) नवी तारीख अधिकृतपणे

Pune Young woman's number leaked : पुण्यात धक्कादायक प्रकार! हॉटेलच्या QR कोडमधून तरुणीचा नंबर लीक, मध्यरात्री आले वैयक्तिक मेसेज

पुणे: डिजिटल युगात हॉटेलमध्ये गेल्यानंतर मेन्यू पाहण्यासाठी QR कोड स्कॅन करणं आता सर्वसामान्य बाब झाली आहे.