मुंबई (प्रतिनिधी) : ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा सध्या भारतातच नव्हे तर जगभरात चर्चेत आहे. आता हा सिनेमा केवळ भारतात नाही तर अन्य देशांमध्येही प्रदर्शित होणार आहे. सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा अभिनीत चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या कमाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रचंड विरोध होऊनही ‘द केरळ स्टोरी’ स्टोरीने बंपर कमाई केलीय. देशात ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला रिलिज होऊन आता ९ दिवस झाले आहेत. या दिवसांत ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. ‘द केरळ स्टोरी’ची अवघ्या ९ दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये दिमाखात एंट्री झाली आहे.
या चित्रपटाच्या यशाचे श्रेय निश्चितच त्याच्या कथेला आणि त्याभोवती निर्माण झालेल्या वादाला जाते आहे. ‘केरळ स्टोरी’ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात माऊथ पब्लिसिटी मिळत आहे. ‘द केरळ स्टोरी’ने पहिल्या बुधवारी म्हणजेच रिलीजच्या ६ व्या दिवशी देखील बंपर कमाई केली होती. या चित्रपटाने बुधवारी एकाच दिवसात चांगलीच १२ कोटींची कमाई केली. मंगळवारपेक्षा त्यात १० टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. त्यामुळे अवघ्या ९ दिवसांत ‘द केरळ स्टोरी’ने केलेली कमाई ही बॉलिवूड सिनेमांना दिलासादायक ठरली आहे.
एकीकडे भारतात अनेक राज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे निर्मात्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला इतर देशांमध्येही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता हा चित्रपट आणखी ३७ देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील प्रमुख अभिनेत्री अदा शर्मा हिने स्वत: ही माहिती पोस्ट शेअर करत दिली आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…