लाल किल्ल्यावरील हल्ल्याचा कट उद्ध्वस्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली पोलिसांनी दहशतवादी संघटना आयएसआय यांच्या एका मोठ्या कटाचा खुलासा केला आहे. दिल्ली पोलिसांनी जानेवारी २०२३ मध्ये दिल्लीतील जहांगीरपुरी भागातून दोन दहशतवाद्यांना अटक केली होती.



नौशद आणि जगजीत या दहशतवाद्यांना दिल्लीतील लाल किल्ल्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्यास सांगितले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने १० मे रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या दहशतवादी संघटनांचा हा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. त्यामुळे देशात होणाऱ्या एका मोठ्या हल्ल्यापासून बचाव झाला असल्याचे देखील म्हटले जात आहे.



यासोबतच त्यांना पंजाबमधील बजरंग दलाचे नेते आणि हरिद्वारमधील साधूंवर देखील हल्ला करण्याचा कट रचला होता. पंजाबमधील बजरंग दलाच्या नेत्यांच्या हत्येसाठी या दहशतवाद्यांना दोन लाख रुपये देखील देण्यात आले होते, अशी माहिती पुढे आली आहे.



तसेच, नौशद आणि जगजीत या दहशतवाद्यांनी आपल्या म्होरक्याचा विश्वास मिळवण्यासाठी एका तरुणाची हत्या देखील केली होती. दोघांनी दिल्लीतील एका तरुणाचे अपहरण केले आणि नंतर त्याची हत्या केली. त्याच्या हत्येचा व्हीडिओ त्या दोघांनी त्यांच्या म्होरक्यांना पाठवला. त्यानंतर म्होरक्याचा विश्वास त्या दोघांवर बसला. दरम्यान, अटक केलेल्या दहशतवाद्यांनी मान्य केले की, ते पाकिस्तानीतील त्यांना सांभाळणाऱ्या चार लोकांच्या संपर्कात होते. दोघांनी पोलिसांना सांगितले की ते पाकिस्तानातील नजीर भट, नासिर खान, नजीर खान आणि हिजबुल मुजाहिद्दिन या लोकांच्या संपर्कात होते. या सगळ्यांना आयइएसच्या आदेशांवर काम करण्यास सांगितले जात होते.

Comments
Add Comment

भारताची अमेरिकेला निर्यात थांबणार?

अमेरिकेकडून रशियावर ५०० टक्के आयात कर ब्राझिल आणि चीनलाही इशारा पुतिन निष्पाप लोकांची हत्या करत असल्याचा

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज