रत्नागिरी: उद्या ११ मे पासून मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट २४ तास वाहतुकीसाठी खुला होणार आहे. काल ९ मे रोजी परशुराम घाटात दरड कोसळली होती. त्यानंतर आता हा रस्ता उद्यापासून वाहतूकीसाठी खुला होणार आहे. दरम्यान, २५ एप्रिल २०२३ पासून परशुराम घाटातील वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
परशुराम घाटाचं काम गेली दोन वर्ष युद्ध पातळीवर सुरू आहे. पावसाळ्याआधी घाटातील रुंदीकरण पूर्ण करायचं होतं. मात्र, ठेकेदाराकडून फक्त ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. रुंदीकरणाच्या ठेकेदार कंपनीनं पावसाळ्यापूर्वी या घाटातील रुंदीकरण आणि उर्वरित कामं पूर्ण व्हावी यासाठी या घाटातील वाहतूक काही दिवस बंद करण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली होती. त्यानंतर ही मागणी मान्य करून येत्या २५ एप्रिल ते १० मेपर्यंत या घाटातील वाहतूक ठराविक वेळेत दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्णतः बंद करण्यात आला होता. मात्र, ४० टक्केच काम झाल्याने प्रवाशांचे पावसाळ्यात हाल होण्याची शक्यता आहे.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…