'सामना'तील अग्रलेखाला शरद पवारांचं सडेतोड प्रत्युत्तर

सातारा : 'सामना' वृत्तपत्रात काल छापून आलेल्या बहुचर्चित अग्रलेखाला शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत सडेतोड प्रत्युत्तर दिले. 'सामनातील अग्रलेखाला आमच्या लेखी महत्त्व नाही', असे खडेबोल त्यांनी यावेळी संजय राऊतांना सुनावले.


पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल, असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला. अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून राष्ट्रवादी आणि पवारांवर करण्यात आली होती.


यावर बोलताना अध्यक्षपदाचा राजीनामा आणि पक्षातील घडामोडी हा आमच्या घरचा प्रश्न आहे, असे शरद पवार म्हणाले. तसेच १९९९ मध्ये मत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, देशमुख, अशा अनेक जणांना पहिल्यांदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. या सर्वांना पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिली होती, असे पवारांनी स्पष्ट केले.


"राष्ट्रवादीत काय होतं हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही काय केलंय हे त्यांना माहित नाही. आमचं एक वैशिष्ट्य आहे की, आम्ही पक्षाचे सर्व सहकारी वेगवेगळ्या गोष्टींवर बोलतो, वेगवेगळी मतंही असतात, पण बाहेर जाऊन त्याची कधीच प्रसिद्धी करत नाही. त्यामुळे आम्ही नेतृत्व तयार करतो किंवा करत नाही, हे कुणी लिहिलं त्याचं आमच्या दृष्टीने काही महत्त्व नाही. ते लिहितील, त्यांना लिहायचा अधिकार आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. उद्या नवीन नेतृत्वाची फळी कशी तयार केली जाते याची खात्री आमच्या पक्षाच्या सर्व सहकार्‍यांना आहे. आम्हाला माहित आहे आम्ही काय करतो आणि त्यात आम्हाला समाधान आहे", असं म्हणत राष्ट्रवादीच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ न करण्याचा सल्ला पवारांनी राऊतांना दिला.

Comments
Add Comment

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली