मुंबई : भाजपने राज्य कार्यकारिणीत बदल केल्यानंतर आता मुंबई कार्यकारिणीतदेखील बदल करण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्याकरता भाजपने मिशन १५० ची घोषणा केली आहे. मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे.
आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २२७ पैकी १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याच दृष्टीने येत्या काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारिणीत बदल करण्यात येणार आहेत.
महिन्याभरात आढावा घेऊन अनेक पदांवर बदली केली जाणार आहे. पन्ना प्रमुख, बुथ प्रमुख या पदांवरील अकार्यक्षम पदाधिका-यांना बदलण्यासोबतच गरज पडल्यास वॉर्ड व जिल्हाध्यक्षदेखील बदलण्यात येतील.