मुंबईत १५ मे पासून पुन्हा होणार ‘जी २०’च्या बैठका

मुख्य सचिवांनी घेतला आढावा


मुंबई (प्रतिनिधी) : ‘जी २०’ अंतर्गत तिसऱ्या ‘एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुप’च्या बैठकीचे नियोजन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने करावे, अशा सूचना मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी येथे दिल्या. मुंबई येथे १५ ते १७ मे दरम्यान तिसऱ्या ‘एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुप’च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांसाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत नवी दिल्लीहून केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.


मंत्रालयात झालेल्या या बैठकीस पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ऊर्जा विभाग प्रधान सचिव आभा शुक्ला, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त वेलारासू, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, उद्योग विकास आयुक्त माणिक गुरसळ, माहिती संचालक हेमराज बागूल, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते.


मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी सांगितले की, ‘बैठकीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना आवश्यक असणाऱ्या सेवा - सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी संबंधित विभागांनी समन्वय अधिकारी नियुक्त करावेत. त्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे’. केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी राज्य शासनाच्या वतीने अपेक्षित सहकार्याबाबत माहिती दिली. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत संबंधित विभागांनी कार्यवाही करावी, अशा सूचना सौनिक यांनी दिल्या. बैठकीस उद्योग विभागाचे सह संचालक सुरेश लोंढे, मुंबई महापालिका उपायुक्त मनीष वळंजू, विनायक विसपुते आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला