भुजबळांचा राऊतांवर हल्लाबोल

नाशिक : 'सामना' वृत्तपत्रात आज छापून आलेल्या अग्रलेखावर छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीची भूमिका मांडली. संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असे वाटते का, असा खडा सवाल त्यांनी केला आहे. तुमचं जेवढं काही आयुष्य असेल तेवढं शरद पवार यांचं राजकारण आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल, असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला. अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून राष्ट्रवादी आणि पवारांवर करण्यात आली आहे.

यावर छगन भुजबळ म्हणाले, "आता संपादक म्हणजे संजय राऊतच हे सर्व लिहित आहेत हे आम्हांला माहित आहे. त्यांना हे सगळे उकळून काढायची काय गरज आहे? त्यांना काय अडचण आहे? राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असं त्यांना वाटतं का?"

"संजय राऊत हे कोणाकोणाच्या घरात गेले होते, आणि कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या हे त्यांनाच माहित. एवढं लक्ष त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बॅगांवर ठेवलं असतं तर आज बाहेर बसण्याची परिस्थिती आली नसती", अशी सडेतोड टीका भुजबळांनी केली आहे.
Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना