महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल 'या' दिवशी जाहीर होणार

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीख जवळजवळ निश्चित झाली असून काऊंटडाऊन सुरू झाले आहे. या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात देखिल विविध भाकिते वर्तवली जात असून चर्चेला उधाण आले आहे.


पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवणार आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आता केवळ दोन तारखाच उरल्या आहेत.


ज्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली, ते पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ आहे. त्यापैकी एक न्यायमूर्ती एम. आर. शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल यायचा असेल तर त्याच्याआधीच येणार हे उघड आहे. न्यायमूर्तींच्या निवृत्तीचा शेवटचा दिवस हा समारंभाचा असतो. त्याआधी १३ मे शनिवार आणि १४ मे रोजी रविवार आहे.


त्यात आणखी एक महत्वाचे असे की, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आणि राजकीय घडामोडींचा संबंध नसतो. परंतु सध्या कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. तेथे १० मे रोजी मतदान आहे. महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याच्या राजकारणाचा निकाल संपूर्ण देशावर परिणाम करणारा असेल. त्यामुळे हा निकाल कर्नाटकच्या मतदानानंतरच येण्याची दाट शक्यता आहे. तसे झाले तर मग ११ आणि १२ मे या दोन तारखा सर्वाधिक महत्वाच्या ठरतात. त्यामुळे ११ किंवा १२ याच तारखांमध्ये निकालाची शक्यता अधिक आहे.

Comments
Add Comment

चिंता करू नका; भारतात गॅस-इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध - मंत्री हरदीप सिंह पुरी

लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पश्चिम आशियातील संकटानंतर देशात गॅस

तुम्हाला 'या' ५ प्रकारे गॅस सिलेंडर बुक करता येणार; कोणता सर्वात सोपा पर्याय?, जाणून घ्या.

नवी दिल्ली: देशातील लाखो कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या हत्येचा प्रयत्न

जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच