साई संस्थानातील पासचा काळाबाजार संपुष्टात येणार? संस्थानाने घेतला धाडसी निर्णय

शिर्डी: जगविख्यात शिर्डी येथील साईबाबा मंदिरातील भाविकांना आरतीचा विनागैरसोय लाभ घेता येणार आहे. शिर्डी येथील साई मंदिरात भक्तांना साईबाबांची आरती करण्याचा पास मिळणे आता अधिक सुलभ झाले आहे. कारण आता शिर्डी येथील साई मंदिरात भक्तांना साईबाबांची आरती करण्याचा पास हा काऊंटरवरच मिळणार आहे. शिर्डी ग्रामस्थ आणि साई मंदिर प्रशासनाची बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दर्शन आणि आरतीच्या पासमध्ये होणारा काळा बाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


त्याचबरोबर या बैठकीमध्ये शिर्डी ग्रामस्थांनी त्यांच्या अनेक मागण्या मांडल्या. त्यानूसार ग्रामस्थांसाठीही विशेष प्रवेशद्वाराने प्रवेश देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले की, आरतीच्या पासमध्ये काळाबाजार केला जातो. भक्तांची फसवणुक केली जाते. त्या दृष्टीने बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. साई संस्थानाच्या कर्मचाऱ्यांना मोबाईल आणण्यास बंदी, साईभक्तांना आरती पाससाठी शिफारशीची गरज नसणार, पास काऊंटरवर शिफारस विनामिळणार आरती पास, साईसंस्थान कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण असे निर्णय घेण्यात आले तसेच कर्मचाऱ्यांना साई भक्तांसोबत वाद न घालता सामंजस्याने वागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील १० हजार गावांसाठी...

अहिल्यानगर: हवामानातील सतत होणारे बदल हे कृषी क्षेत्रासमोर मोठे आव्हान बनले असून त्याचा थेट परिणाम शेती

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या; अखेर थरारक प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून केल्याची

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पुणे :  पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील

'नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी'

नाशिक : नाशिक जिल्ह्यात २०२७ मध्ये होणार असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी. कुंभमेळ्याला

शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या संस्था येत्या ३० एप्रिलपर्यंत गॅस सिलिंडरचा पुरवठा

मुंबई: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिजविलेला आहार पुरवठा करणा-या महिला

Missing Link' Project: मुंबई-पुण्यातील अंतर कमी होणार, 'मिसिंग लिंक'चं काम पूर्ण; लवकरच प्रवाशांसाठी खुला

मुंबई: बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. या प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या एक