राष्ट्रवादीचे ठरले! सुप्रिया सुळे होणार राष्ट्रीय अध्यक्ष!

१५ दिवसांपूर्वीच झाला होता निर्णय, भुजबळांनीही दिले संकेत


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत आहेत. परंतु, अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेच यांचीच वर्णी लागेल, अशी माहिती समोर येत आहे.


सुप्रिया सुळे यांना पक्षाध्यक्ष होण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया १५ दिवसांपासून सुरू आहे. दस्तुरखूद्द सुप्रिया सुळे यांनीच १५ दिवसांत दोन स्फोट होतील असे संकेत दिले होते. त्याचवेळी अजित पवार यांचे कथित नाराजी नाट्य सुरू होते. त्यावेळीच पक्षाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, अशी माहिती आता समोर येत आहे.


सुळे यांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव आधीच झाली होती. लवकरच निवडणूक आयोगाला याबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या पक्षाच्या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब केले जाण्याचीही शक्यता आहे.


दरम्यान, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. सुप्रिया सुळे यांनी अध्यक्ष होण्यास काहीच अडचण नाही. कामाची विभागणी आधीच झाली आहे. राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशी विभागणी झाली आहे. त्यांचे लोकसभेत काम आहे. त्यामुळे त्या अध्यक्ष होण्यात काहीच अडचण नाही, असे भुजबळ म्हणाले.


दरम्यान, राष्ट्रवादीच्या २६ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत शरद पवार यांच्या राजीनाम्याची चर्चा झाली होती. तर शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या बैठकीत पवार यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

तापमानचा पारा घसरणार, राज्यात भरणार हुडहूडी!

मुंबई: देशात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली

हद्दपार गुंडाने शहरात वास्तव्य करत केला महिलेवर बलात्कार! पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह

पुणे: पु्ण्यात गुन्हेगारी क्षेत्रातील वाढ नवीन नसली तरी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय