जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा

मुंबई: शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताच आज जितेंद्र आव्हाड यांनीही पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. लोकशाहीत त्यांना लोकांचे ऐकावेच लागेल. लोकांच्या बाजूने निर्णय घ्यावा लागेल, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.


दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त होते. मात्र, प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचे सांगितले. सध्याही राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार यासाठी बैठकावर बैठका सुरू आहेत.


दरम्यान, आव्हाडांसोबत ठाण्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवले. जितेंद्र आव्हाड याबाबत म्हणाले की, शरद पवारांसाठी आमचे आयुष्य काहीच नाही का? ही लढाई आम्ही शरद पवारांशिवाय कशी काय लढणार? मी आतापर्यंत जी-जी भूमिका घेतली, ती लोकांनी आणि नंतर पक्षाने घेतली. शरद पवार नेहमी नव्या लोकांना संधी देतात. आता आम्हीही राजीनामा दिला आहे. नव्या लोकांना घ्यावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.