मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने २०२३-२४ हे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. या वर्षात शाळांना तब्बल ७६ दिवस सुट्टी मिळणार आहे. यात विविध सण व उत्सवाच्या तब्बल २७ दिवसांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. दरम्यान शाळांचे कामकाज २३८ दिवस सुरू
राहणार आहे.
दरवर्षी नवे शैक्षणिक वर्षाचे सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत असते. प्रथम सत्र हे १५ जून २०२३ ते ७ नोव्हेंबर २०२३ असे असणार आहे. त्यानंतर ८ ते २१ नोव्हेंबर २०२३ पर्यंत १० दिवसांची दिवाळी सुट्टी असणार आहे. द्वितीय सत्र २२ नोव्हेंबर २०२३ ते १ मे २०२४ पर्यंत असेल. उन्हाळी सुट्टी २ मे ते १४ जून २०२४ अशी ३७ दिवस मिळणार आहे.
शाळांना उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ यांसारख्या सणांना शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने सुट्टीचे समायोजन करता येणार आहे. शैक्षणिक वर्षात एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. शाळांचे कामाचे दिवस किमान २३० असलेच पाहिजेत. मुख्याध्यापकांच्या अखत्यारितील २ स्थानिक सुट्ट्या निश्चित करून त्या शिक्षणाधिकाऱ्यांना कळवाव्या लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या स्थानिक सुट्ट्या व शासन स्तरावरून जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्या शाळांनी घेणे बंधनकारक आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात चार सार्वजनिक सुट्ट्या रविवारीच आल्या आहेत. यामध्ये १५ ऑक्टोबर-घटस्थापना, १२ नोव्हेंबर-लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, १४ एप्रिल-डॉ. बाबासोहब आंबेडकर जयंती, २१ एप्रिल-महावीर जयंती यांचा समावेश आहे. त्यामुळे शाळांच्या या चार सार्वजनिक सुट्ट्या कमी झाल्या आहेत.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…