मुंबई : २०१५ सालापासून महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून रेडिओवरून जनतेशी थेट संवाद साधत आहेत. या विशेष कार्यक्रमाच्या १०० व्या भागाचे, येत्या ३० एप्रिल रोजी प्रसारण होत आहे.
यानिमित्ताने ‘मन की बात’ कार्यक्रम मुंबईत मोठ्या स्तरावर पाहण्यात तसेच ऐकण्यात यावा, याकरिता राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे.
पंतप्रधानांच्या १०० व्या ‘मन की बात’चा विशेष कार्यक्रम भायखळा महिला कारागृह, मुंबई येथे आयोजित करण्याची परवानगी देण्याबाबत तसेच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर हमाल बांधवांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना, मंत्री लोढा यांनी पत्र लिहिले होते.
त्यानुसार भायखळा कारागृहातील महिलांसाठी आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर हमाल बांधवांसाठी, पंतप्रधानांचा ‘मन की बात’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मिळाली असून, रविवार दिनांक ३० एप्रिल रोजी, सकाळी ११ वाजता, हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…