फाइल मिळाली पण, बंगले आणि पुरावे गायब!

उद्धव ठाकरेंच्या १९ बंगल्यांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची सोमय्यांची मागणी


मुंबई : रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातील उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांची मंत्रालयातून गायब झालेली फाईल सापडली असली तरी या फाईलमधील ठाकरे यांनी गायब केलेले बंगले अजूनही मिळालेले नाहीत. तसेच त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी जो प्रॉपर्टी टॅक्स भरला होता आणि अन्वय नाईक यांच्याकडून बंगले घेतल्या संदर्भातील मी पुरावे पत्रकार परिषदेत दिले होते. ते आणि या फाईल मधील अनेक कागदपत्रे आणि मी दिलेले पुरावे हे गायब केले गेले आहेत, असा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.


तेव्हा, ठाकरेंनी केलेल्या या बंगल्यांच्या घोटाळ्याची उच्चस्तरीय किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.


अलिबाग जवळच्या कोर्लई गावात उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने १९ बंगले अधिकृतपणे बांधण्यात आले होते. पण, आरोप करण्यात आल्यानंतर हे १९ बंगले जमीनदोस्त झाले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी यापूर्वी केला आहे. किरीट सोमय्या यांनी याबाबत तक्रार सुद्धा दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावातील माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली होती.


'अशी ही बनवाबनवी'


सोमय्या म्हणाले की, या १९ बंगल्यांच्या घोटाळ्याची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करावी किंवा अन्य तपास यंत्रणांची मदत घ्यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. २१ एप्रिलला मुख्यमंत्री कार्यालय आणि महसूल कार्यालयाने फाईल एकमेकांकडे असल्याचे सांगितले होते. काल महसूल मंत्रालयाकडून मला फोन आला की महसूल मंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या कपाटात ही फाईल होती. खरेच ती फाईल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कपाटात होती का, असा सवाल करत 'अशी ही बनवाबनवी' असे या फाइलला नाव देणार असल्याचे सोमय्या म्हणाले.


पुरावे केले गायब, अधिकारी सुद्धा दोषी, कारवाईची मागणी


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना फक्त जागेवर जाऊन फोटो काढण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी जो प्रॉपर्टी टॅक्स भरला होता आणि अन्वय नाईक यांच्याकडून बंगले घेतल्या संदर्भातील मी पुरावे पत्रकार परिषदेत दिले होते. या फाईल मधील अनेक कागदपत्रे आणि मी दिलेले पुरावे हे गायब केले गेले आहेत, असे ते म्हणाले.


खोटी प्रॉपर्टी उभी केल्यासंदर्भात रश्मी ठाकरे विरोधात खरंतर उद्धव ठाकरे यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे होता. ज्या अधिकाऱ्यांनी या रिपोर्टवर सह्या केल्या आहेत ते अधिकारी सुद्धा दोषी आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम