चारधाम यात्रा : २० क्विंटल फुलांची आरास करुन मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी उघडले

उत्तराखंड :  केदारनाथ येथे गेल्या ७२ तासांपासून बर्फवृष्टी सुरु आहे. बाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जाणार्‍या हजारो भाविकांना या खराब वातावरणामुळे रोखण्यात आले होते. मात्र केदारनाथ धामचे दरवाजे मंदिराचे मुख्य पुजारी जगद्गुरू रावल भीम शंकर लिंग शिवाचार्य यांनी सकाळी ६:२० वाजता उघडले. मंदिराला २० क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे. प्रशासनाने रोखल्यानंतरही मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले. सूत्रांनुसार, ८ हजारांहून अधिक लोक बाबांच्या दर्शनासाठी जाणार आहेत.


तापमान उणे ६ अंशांच्या आसपास असूनही पहाटे ४ वाजल्यापासूनच दर्शनासाठी भक्तांच्या मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरवाजे उघडण्याची प्रक्रिया पहाटे ५ वाजल्यापासून सुरु करण्यात आली. धार्मिक परंपरा पार पाडण्यात आली. भाविकांनी केलेल्या जयघोषासोबत बाबा केदार यांची पंचमुखी भोग मूर्ती पालखीतून रावल निवास येथून मंदिर परिसरात नेण्यात आली. ही पालखी सोमवारी दुपारी केदारनाथ धाममध्ये पोहोचली.


शनिवारी अक्षय्य तृतीयेपासून चारधाम यात्रेला सुरुवात झाली. पुढील ५ दिवसांत हिंदू यात्रेकरू बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीला भेट देतील. २२ एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्रीचे कपाट उघडण्यात आले. बद्रीनाथ धामचे दरवाजे २७ एप्रिलला उघडणार आहेत.


हवामान खात्याच्या अंदाजानुसार केदारनाथमध्ये पुढील एक आठवडा अतिवृष्टी आणि खराब हवामानाची शक्यता आहे. उत्तराखंड सरकारने केदारनाथमध्ये सुरु असलेली अतिबर्फवृष्टी आणि हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेऊन ३० एप्रिलपर्यंत चारधाम यात्रेसाठी यात्रेकरुंची नोंदणी थांबवली आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनही आवश्यक कार्यवाही करत आहे. राज्य सरकारने यात्रेकरुंना सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी घेण्याची सूचना दिली आहे.

Comments
Add Comment

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर

विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच पश्चिम बंगालमध्ये अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

कोलकाता : पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा रविवार १५ मार्च रोजी निवडणूक