ऋतू हिरवाच्या शब्दसुरात रंगली एक संध्याकाळ

कल्याण : ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांची 'ऋतू हिरवा' ही सांगीतिक मैफल कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पार पडली. या कार्यक्रमाला कल्याणकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.


हेमलकसा येथील पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या आर्थिक मदतीसाठी निधी संकलन म्हणून रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडच्या वतीने आयोजित केलेल्या या सांगीतिक संध्येची सुरुवात जेष्ठ गायक श्रीधर फडके, क्लब प्रेसिडेंट रो. राजेश चासकर, प्रकल्प प्रमुख रो. अरविंद शिंदे, सेक्रेटरी रो. अभिलाषा पवार, ट्रेझरर रो. पल्लवी चौधरी आणि अक्षरमंच प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. योगेश जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या "ने मजसी ने परत मातृभूमीला" या गाण्याने श्रीधर फडके यांनी ऋतू हिरवा या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर त्या कोवळ्या फुलांचा, फिटे अंधाराचे जाळे, ओंकार स्वरुपा, जय शारदे वागिश्वरी, ऋतू हिरवा ऋतू बरवा, मी राधिका मी प्रेमिका, अशा एकाहून एक सुंदर रचना श्रीधर फडके व त्यांचे सोबत असलेल्या सहगायिका शिल्पा पुणतांबेकर, शेफाली साकुरीकर यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.


गाणे सादर करण्यापूर्वी श्रीधर फडके आणि निवेदिका सुकन्या जोशी यांनी गाण्याची जन्मकथा व त्या गाण्याविषयक आठवणी सांगून सांगीतिक संध्येमध्ये रंग भरला. तुषार आगरे (तबला), व्यंकटेश कुलकर्णी (तालवाद्य), ओमकार गोखले (की बोर्ड), वरद कठापूरकर (बासरी) यांनी वादन साथ दिली.


कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक म्हणून अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने सचिव हेमंत नेहेते यांनी काम पाहिले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी फर्स्ट लेडी गायत्री चासकर, सचिन पीतांबरे, प्रबोध तनखीवाले, अतुल धुमाळ, सचिन चौबे, डॉ. घोणे, शरद चासकर, एम. जे. मुशिर, बाळासाहेब एरंडे, संजय पैठणकर, सोमनाथ चौधरी, डॉ. स्मिता तनखीवाले, निशिगंधा वनसूत्रे, क्षमा कुलकर्णी, संगीता अ. शिंदे, पल्लवी पीतांबरे, रोटरी सदस्य तसेच रोट्रॅक्ट क्लबचे अभिजित बाऊसकर, ओंकार धुमाळ, सतीश गुप्ता, प्रणित कासरे, तेजस्विनी बाऊसकर, देव नागरवाला, आनंद काजरोले, सानिया पाटील, प्रणाली पाटील यांनी सहकार्य केले.


या कार्यक्रमाला डीजीएनडी हर्ष मकोल, सीडीएमटी मेम्बर ललित मानिक, प्रमोद मौलवी तसेच एसीपी उमेश माने पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

Comments
Add Comment

ठाणेकरांचा प्रवास होणार वेगवान! शीव उड्डाणपुल समांतर उभारणार दोन पदरी पूल

ठाणे : मुंबई महापालिकेने शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसोबतच त्याच्या समांतर दोन पदरी नवीन उड्डाणपूल

नवी मुंबईतील महत्त्वाचा बस डेपो अखेर ६ वर्षांनंतर सुरू

१९० कोटींचा खर्च, २१ मजली भव्य बांधकाम नवी मुंबई : सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वाशी येथील महत्त्वाचा

ठाणे महापालिका निवडणुकीचा काऊंटडाऊन सुरू

१९४२ केंद्रांवर ९७१० कर्मचारी तैनात ठाणे : ठाणे महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच, सर्वच राजकीय पक्षांतील

ठाण्यात शुक्रवारपर्यंत पाणीकपात

कल्याण फाटा येथे नादुरुस्त झालेल्या जलवाहिनीचे काम सुरू ठाणे  : कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये

ठाण्यात अजित पवार आजमावणार स्वबळ

तिन्ही पक्ष महायुतीत निवडणुका लढणार नाहीत ठाणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत

नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा ; डिसेंबरमध्ये आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.नवी मुंबईतील उरण परिसरात रानसाई धरणातून पाणीपुरवठा