नख हे जसे सौंदर्याचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे ते चांगल्या आरोग्याचे देखील प्रतीक मानले जाते; परंतु बरेचदा नख हे दुर्लक्षित केले जाते. नखांवर दिसणारे वेगवेगळे रंगाचे डाग तुमच्या आरोग्याची धोक्याची सूचना देऊ शकतात. नखांना आरोग्याचा आरसा मानले जाते. जर तुम्हाला तुमचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल, तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नखांचा त्वरित उपचार करावा. याच
नखांचे विविध आजार आपण आजच्या भागात बघणार आहोत.
आपली नखे केराटीन नामक प्रथिनांपासून बनलेली असतात, जे केसांसाठी देखील खूप आवश्यक असते. जेव्हा आपल्या शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता असते किंवा शरीरात कोणताही आजार असतो तेव्हा या प्रथिनांवर परिणाम होऊन त्याचा असर नखांवर दिसून येतो. अशा नखांचे विविध भाग खालीलप्रमाणे असतात,
– नेल मैट्रिक्स, नेल बेड, नेल प्लेट आणि नेल फोल्ड्स. नखांचे फंगल इन्फेक्शन – नखांना बुर्शीचा संसर्ग होऊन नखांचा रंग बदलणे व नखाखालची त्वचा जाड होणे ही नखांची एक सामान्य तक्रार आहे. सतत दलदल, पाणथळ भागात फिरणे, पोहण्याच्या तलावामध्ये दीर्घकाळ पोहणे, पाण्यात भिजलेले बूट वारंवार वापरणे, अंगठ्याच्या नखाजवळ जखम होणे, अति घाम येणे, यामुळे नखांचे फंगल इन्फेक्शन होऊ शकते. यामध्ये नखांना पांढरे, काळे व पिवळे ठिपके दिसू लागतात, नखं जाड होऊ लागतात. आपल्या नखांना बुर्शीचा संसर्ग झाला आहे, अशी शंका येताच त्वचा रोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते, नाही तर याचा त्रास वाढू शकतो. ससर्ग टाळण्यासाठी पाय नेहमी कोरडे व स्वच्छ ठेवणे गरजेचे ठरते व त्वचारोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अँटिफंगलच्या गोळ्या व मलमांचा वापर केला जातो. जर तुम्हाला मधुमेह असेल, तर नखांची काळजी गांभीर्याने घेण्याची गरज असते कारण मधुमेही रुग्णांमध्ये दीर्घकाळ उपचार करावा लागतो.
या आजाराला त्राकिओंन्किया (trachyonychia) असेही म्हणतात. यामध्ये नखांच्या वरच्या भागाला उभ्या भेगा पडतात, नख पातळ होते व नखे तुटतात. हे सहसा लहान मुलांमध्ये बघायला मिळते. याची बरीच कारणे असतात. जसे की, लाइकेन प्लानस, अलोपेशीया अरेअटा, सोरायसिस, अटोपिक डर्मेटाइटिस, इच्थ्योसिस वलगारिस वगैरे.
नखांच्या रंगावरून रुग्णाला काही आजार आहेत काय याचा तर्क आपण लावू शकतो, जसे नख निळे होणे – रक्तामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असणे
नख पांढरे होणे – यकृताचे आजार, मधुमेह
नख फिकट गुलाबी होणे – अॅनिमिया (रक्तामध्ये लोहाचे कमी प्रमाण असणे)
अर्धे गुलाबी, अर्धे पांढरे नख – मूत्रपिंडाचे आजार
पिवळे नख – फुप्फुसांचे आजार.
यामध्ये नखाभोवताची त्वचा नेहमीपेक्षा जास्त गोलाकार होते व बोटांचा पुढचा भाग समान्यापेक्षा मोठा होतो. हे शारीरिक आजाराशी देखील निगडित रहू शकते. फुप्फुस, हृदय, यकृत, पोटाच्या किंवा आतड्यांच्या आजरांमध्ये ही परिस्थिती दिसून येते.
यामध्ये नखांचा पृष्ठभाग जास्त वाढतो व तो जाड होतो. हे आनुवांशिक असू शकते किंवा काही चर्मरोगाशी संबंधित असू शकते जसे की, इच्थ्योसिस (icthyosis), सोरायसिस, नखंना मार लागने, पेरिफेरल वैस्कुलर डिजीज (peripheral vascular disease) वगैरे.
मेल्यानोमा हा नखांचा एक कर्करोग आहे; परंतु भारतीयांमध्ये हा आजार फार कमी प्रमाणात बघायला मिळतो. यामध्ये नखांच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाची उभी रेघ येते. ह्या रोगाचे पक्के निदान करण्यासाठी नेल बीओप्सी (nail biopsy) करावी लागते. वेळीच त्वचा रोग तज्ज्ञांना भेटल्याने त्याचे निदान लवकर होऊ शकते व वेळीच उपचार सोईचे ठरते.
यामध्ये नखांची आजूबाजूची जागा लाल होते, सुजाते व तिथे खूप वेदना होतात. हे सहसा जंतूच्या संसर्गामुळे होते. ज्या मुलांना हाताच्या बोटाचे नख खायची सवय असते त्यांच्या नखांना इजा होऊन सुद्धा याचा त्रास होऊ शकतो. यामध्ये पस झालेला त्वचेचा भाग सुईने छेद देऊन पस काढला जातो व तुमचे डॉक्टर तुम्हाला काही दुखणे कमी करण्याच्या व अँटीबायोटिकच्या गोळ्या देतात जेणेकरून संसर्ग पूर्णपणे ठीक होतो.
नखांवरील खड्डे हे काही चर्मरोगाशी निगडित असू शकतात जसे की, सोरायसिस, अॅटोपिक डर्मेटाइटिस, अलोपेशिया अरेअटा, एक्जिमा, लाइकेन प्लानस वगैरे. कधी कधी केवळ नखावरील खड्यांवरून आपल्याला काही चर्मरोगाची कल्पना येऊ शकते. ज्या लोकांना नखांचा सोरायसिस असतो त्यांमध्ये याचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येते.
यामध्ये नख पातळ होऊन त्याचा वरचा भाग चमच्यासारखा अंतर्गोल होतो. हे सहसा रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे उद्भवते. याच्या उपचारामध्ये डॉक्टर तुम्हाला आयरनच्या गोळ्या घ्यायला सांगतात. ज्यामुळे तुमचे नख पूर्ववत होते.
याबद्दलची माहिती आपण आधीच्या अंकात बघितली आहे.
सारांश : नख हे दिसायला छोटे अवयव जरी असेल तरी त्याचे खूप महत्त्व आहे. किंबहुना नखाच्या स्वरूपावरून आपल्याला शरीरात चालू असणाऱ्या अरोग्यविषयक घडामोडींचा अंदाज घेता येतो. नखांच्या विकारांचे वेळीच त्वचारोग तज्ज्ञांकडून उपचार केल्यास नाखंचे आरोग्य सुदृढ ठेवू शकतो.
ट्विट करत दाखवलं भारतावरचं प्रेम बंगळुरू : भारतात बंगळुरू येथे २४ मे रोजी होणार असलेल्या एनसी…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या…
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…