दोन दिवसात मोठं काहीतरी घडणार!

  184

पुणे : बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पाठोपाठ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा महाराष्ट्रातील संभाव्य राजकारणात दोन दिवसात मोठं काहीतरी घडणार असल्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे काही आमदारांसह फुटून भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. राजकीय नेत्यांना जिथं-तिथं हेच प्रश्न विचारले जात आहेत. अजित पवार यांनी काल या चर्चा फेटाळल्या असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येत्या दोन दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.


त्या पत्रकारांशी बोलत होत्या. येत्या दोन दिवसांत दोन मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असे त्या म्हणाल्या. त्यातली एक दिल्लीत होईल आणि दुसरी महाराष्ट्रात होईल, असे त्या म्हणाल्या.


अजित पवार हे भाजपसोबत जाणार का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर, 'हा प्रश्न तुम्ही अजितदादांनाच विचारा. माझ्याकडे गॉसिप करण्यासाठी वेळ नाही. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहे. त्यामुळे या गोष्टींबद्दल मला फारशी माहिती नाही. अजितदादा हे काम करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल अशी विधाने केली जातात, अशी पुस्तीही सुप्रिया सुळे यांनी जोडली.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची