मुंबई : मागच्याच आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अवकाळाची तडाखा बसला होता. गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आता पुन्हा हवामान विभागाने आजपासून रविवारपर्यंत अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा दिला आहे.
राज्याच्या अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. त्यानुसार पुणे, नगर, बीड, उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
तर जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण विभागातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.