एखाद्याला राजकारणातून संपवून टाकायचे असेल तर शरद पवार काय खेळी करतात?

शहाजी बापू पाटील यांनी केला खळबळजनक खुलासा...


सांगोला: शरद पवारांना (Sharad Pawar) ज्याला कुणाला राजकारणातून संपवायचे असल्यास ते त्यांना जवळ घेतात व राजकारणातून संपवून टाकतात, असं खळबळजनक विधान शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी केले आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्ष व इतर अनेक छोटे-मोठे पक्ष संपवून टाकले, असेही ते म्हणाले आहेत.


शहाजी बापू पाटील हे कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. महाराष्ट्रात सरकार स्थापन होत असताना त्यांच्या एक डायलॉग खूप फेमस झाला होता. 'काय डोंगार, काय झाडी. एकदम ओके' या डायलॉगमुळे ते महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले होते. त्यानंतरदेखील त्यांची वक्तव्य कायम चर्चेत राहिली आहेत. आता त्यांच्या शरद पवारांवरील वक्तव्याने खळबळ उडाली आहे.


त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दलही खळबळजनक विधान केले आहे. अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा प्लॅन होता की, शिवसेनेच्या आमदारांची संख्या १० ते १५ च्यावर जाऊ द्यायची नाही. तसेच आमचे ४० आमदार पाडण्याची तयारी अजित पवार व बाळासाहेब थोरातांनी केली होती, असा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. तसेच आगामी निवडणुकीत माझे तिकीट कापण्याची तयारी देखील अजित पवारांनी केली होती, असे ते म्हणाले आहेत.


दरम्यान, यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे देखील होते. शहाजी बापूंच्या मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ होत असून यानंतर माध्यमांशी बोलताना शहाजी बापूंनी ही खळबळजनक विधाने केली.

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व