Sunday, July 14, 2024
Homeक्रीडासनरायझर्स तर जिंकले पण मालकीण काव्या का भडकली? व्हिडिओ होतोय व्हायरल...

सनरायझर्स तर जिंकले पण मालकीण काव्या का भडकली? व्हिडिओ होतोय व्हायरल…

हैदराबाद: रविवारी झालेल्या सनरायझर्स हैदराबाद या टीमची मालकीण काव्या मारन आज चर्चेचा विषय ठरतेय. कारण, ठरलंय तिचा रागावलेला चेहरा. नेहमी हसतमूख छबी असणाऱ्या काव्याला असं अचानक काय झालं असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काव्या मारन ही इंटरनेटवर सतत तिच्या फोटोंमुळे ट्रेंडिग असते. पंजाब किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कॅमेरामनने पुन्हा कॅमेरा तिच्यावर फिरवला पण यावेळेस काव्याला राग आला. अशी काही प्रतिक्रिया तिने दिली की ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रविवार ९ एप्रिलची रात्र सनरायझर्स हैदराबादसाठी खूप संस्मरणीय ठरली. संघाच्या दमदार कामगिरीने त्यांनी पंजाबच्या संघावर पहिला विजय नोंदवला. हा सामना हैदराबादमध्येच त्यांच्या घरच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. अशा परिस्थितीत या पहिल्या विजयानंतर चाहत्यांच्या आणि खेळाडूंच्या आनंदाला वाव राहिला नाही. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनही आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली. काव्या नेहमी आनंदात असते. संघाला ती कायम छोट्या छोट्या गोष्टीत पाठिंबा देत असते. पण कालच्या सामन्यात तर संघ जिंकला मग काव्याने खुश होण्याऐवजी अशी प्रतिक्रिया का दिली, असा प्रश्न सगळ्यांना पडत आहे.

तर झालं असं की एसआरएच आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात कॅमेरामनने तिच्या चेहऱ्यावर कॅमेरा आणल्यावर ती भडकली. कॅमेराकडे बघत ती ‘हट यार’ म्हणाली. तिची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडिओ इंटरनेटवर वणव्यासारखा पसरत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aumbeti Roydo (@aumbetiroydo)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -