संभाजीनगरमध्ये सर्वांनी शांतता राखावी - गृहमंत्री

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन


नागपूर : छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात आज रात्री दोनच्या सुमारास दोन गटात राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचेही बघायला मिळाले. दरम्यान, संभाजीनगर येथील घटना दुर्दैवी आहे, आता संभाजीनगर येथील परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता राखवी, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

संभाजीनगरमधील तणाव आता निवळला आहे. आम्ही त्याकडे लक्ष ठेऊन आहोत. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही संभाजीनगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच तणाव निर्माण होईल, असे वर्तन कोणीही करू नये. सर्वांनी शांतता ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्रासह देशभरात राम नवमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. रामनवमीनिमित्त संपूर्ण राज्यात विविधकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह राज्यभरातील राम मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी बघायला मिळते आहे. दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही शिर्डीत रामनवमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.
Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या