मुंबई : ‘दी मॅजेस्टिक’ या महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अतिथीगृह तथा आमदार निवास वास्तुच्या नुतनीकरण कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याचबरोबर या वास्तुच्या कोनशिलेचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ. राजेंद्र भागवत आदींसह विधानमंडळ तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या वास्तुचे अत्याधुनिकरण आणि सुशोभिकरण येत्या १८ महिन्यात पूर्ण करणार असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी सांगितले.
फोर्टमधील ‘दि मॅजेस्टिक’ वास्तू ही ग्रेड २ए हेरिटेज इमारत असून ती जर्जर आणि धोकादायक झाली आहे. तीचे संवर्धन करणे आवश्क असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या इमारतीचे नुतनीकरण करण्यात येत आहे. हे नुतनीकरण करताना या हेरीटेज वास्तुला कोणताही धक्का लावण्यात येणार नाही.
या इमारतीच्या नवीन आरखड्यानुसार तळमजल्या भव्य प्रवेशद्वार आणि रिसेप्शन लॉबी असेल तसेच दिवसभर जेवण, कॉफी शॉप त्याचबरोबर मल्टी क्युझिन रेस्टॉरंट आहे. पहिल्या मजल्यावर दिव्यांग अतिथीसाठी युनिव्हर्सल सूट आणि जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांनी युक्त असे ७२ डिलक्स आणि सुपर डिलक्स अतिथी खोल्या आणि सूट प्रस्तावित आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर कार्यालये प्रस्तावित केली आहेत. तर चौथ्या मजल्यावर प्रसिडेंशियल सूट प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे गच्चीवर बँकेट हॉल तर तळघरात कर्मचाऱ्यांसाठी सेवा ब्लॉक प्रस्तावित करण्यात आले आहे.
काश्मीरच्या निळ्याशार आकाशाखाली, निसर्गाच्या कुशीत… पुन्हा एकदा दहशतीचा अंधार दाटलाय. निसर्गदृश्यांचं स्वर्ग जिथं वाटायचं, तिथंच…
मुंबई: अनेक लोकांना हा प्रश्न पडला आहे की सोन्याचे भाव १ लाख पर्यंत कसे पोहोचले.…
बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात 'नवीन बीड पॅटर्न' सध्या चर्चेत आहे, पण त्यामागचं काळं वास्तव आणखी…
ठाणे : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वाढत्या तापमानानुसार पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. अशातच…
बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…
सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…