शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही


मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.


विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा आज सकाळी विधानसभेत उपस्थित केला, त्यावर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.


अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात काल नांदेड आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे, त्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसार आज अर्धापूर आणि मुदखेड या तालुक्यात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामे करण्याचे काम सुरु आहे तर नाशिक जिल्ह्यात देखील नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू आहेत. या नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला प्राप्त होईल. गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झालेले आहेत, असे सांगून कालपासून ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे, त्या भागात देखील पंचनामे सुरु असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

'Deool Band-2' Movie : ‘देऊळ बंद २’चा महाराष्ट्रभर धुमाकूळ! पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल

मुंबई : महाराष्ट्रभर ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा गजर घुमवत बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा

Davkhare : गावदेवी भाजी मंडई आग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, आमदार डावखरेंची मागणी

Thane : ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून

Prasad Lad : प्रसाद लाड यांनी स्वीकारले जरांगे पाटील यांचे चर्चेचे निमंत्रण; उद्या आंतरवलीत भेट

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; २३ मे च्या 'डेडलाईन'पूर्वी सरकारच्या वतीने मध्यस्थी मुंबई : मराठा आरक्षणाच्या

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा निर्धार मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले आहेत.