पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा निर्धार


मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले आहेत. लवकरच पक्षसंघठनेच्या मजबूत बांधणी आणि विस्तृत विस्तारासाठी पक्षाचे सर्वजण एकत्रितपणे राज्यव्यापी दौरा करणार आहोत, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी आज दिल्ली येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.



पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात निवडणूक आयोगाला जे काही सुधारित पत्र द्यायचे आहे, ते येत्या काही दिवसांत दिले जाईल. त्यासाठी पक्षांतर्गत बैठकीत सर्व नेत्यांची सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
विलीनीकरणाबाबत पवार साहेबांच्या (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आदरणीय सुप्रियाताई यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे त्या विषयात आता काहीही शिल्लक राहिलेले नाही. असे खा. सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर चालणारा पक्ष आहे. तसेच, स्व. चव्हाण साहेबांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आम्ही सर्वजण एकत्रितपणे चर्चा करतो. पक्षातील सर्व निर्णय एकमताने घेतले जातात. आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे. अशी स्पष्ट भूमिका खा. तटकरे यांनी या पत्रकार परिषदेत मांडली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकशाही विकास आघाडी ( एनडीए) मध्ये प्रमुख घटक पक्ष असून, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात काम करत आहोत. ही भूमिका कायम ठेवूनच पुढील काळात विकासाभिमुख कामांना अधिक गती देणार आहोत. असेही प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Raksha Bandhan Gifts 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका ही गिफ्ट्स; मानली जातात अशुभ!

मुंबई : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर

TVJA Dahi Handi : TVJA गोविंदांचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडवत दहीहंडी उत्साहात

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Health Tips : रोजच्या आयुष्यातील 'या' १० सवयी आपल्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; आजच करा बदल

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी अगदी सामान्य वाटतात. मात्र, त्यांचा सतत आणि दीर्घकाळ परिणाम शरीरावर