Friday, June 20, 2025

समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, ५ जण मृत; ७ गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, ५ जण मृत; ७ गंभीर जखमी

बुलढाणा : नागपूर ते शिर्डी समृद्धी या महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते मेहकरदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यूमुखी पडले तर ७ जण गंभीर जखमी झाले. जखमींना मेहकरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही कार छत्रपती संभाजीनगर वरून शेगावला जात होती. त्या प्रवासादरम्यान कार उलटल्यामुळे हा भीषण अपघात झाला. यात अर्टिका गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे.


मृतांमध्ये एका लहान मुलासह चार महिलांचा आणि ड्राइवरचा समावेश आहे. हा अपघात सकाळी ७ वाजता झाला. या अपघातानंतर जवळपास पाऊण तास कोणतीही मदत त्यांना मिळू शकली नाही. हा महामार्ग नवीन असल्यामुळे तेथे अद्याप जवळपास कुठली मदतकेंद्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे.


हा महामार्ग ऍक्सेस कंट्रोल असल्यामुळे या महामार्गावर गाड्या प्रचंड वेगाने सुसाट सुटतात आणि त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटते आणि भीषण अपघात होतात.

Comments
Add Comment