शेतकऱ्यांना फक्त १ रुपयात पीक विमा

शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा


मुंबई: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाद्वारे शेतकऱ्यांना गुडन्यूज दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आता फक्त एक रुपयात पीक विमा मिळणार आहे. विमा हप्त्याची रक्कम अतिशय कमी केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जात होती पण, आता शेतकऱ्यांवर कोणताच भार राहणार नाही. राज्य सरकारच शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरणार आहे. यासाठी ३ हजार ३१२ कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.


राज्य सरकारने यंदा अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक भरीव घोषणा केली आहे. पीकविम्याप्रमाणेच वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी ७५ हजार रुपये वार्षिक भाडेपट्टा, दिवसा वीजपुरवठ्यासाठी ३ वर्षांत ३० टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण यातून ९. ५० लाख शेतकर्‍यांना लाभ देणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू