आ.बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा, दोन तासात जामीन

उच्च न्यायालयात दाद मागणार


नाशिक(प्रतिनिधी): अनोख्या शैलीतल्या आंदोलनांसह वादग्रस्त आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले आमदार बच्चू कडू यांना शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणात कडू यांना जिल्हा न्यायालयाने त्वरित अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणात बच्चू कडू यांचे वकील मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. २०१७ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर आमदार कडू यांनी हात उगारला होता. सरकारवाडा पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आमदार कडू यांना त्यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नाशिक महापालिकेत अपंगांसाठी असलेला तीन टक्के राखीव निधी खर्च न केल्यामुळे झालेल्या वादात आमदार कडू आयुक्तांवर संतप्त झाले होते. कडू यांनी आयुक्तांबरोबरच अधिकाऱ्यांनाही शिवीगाळ केली होती. या प्रकरणी तत्कालीन महापालिका आयुक्त कृष्णा यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.



प्रकरणाची पार्श्वभूमी :


प्रहार संघटनेच्या वतीने २०१७ साली नाशिक महानगरपालिकेत आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनाला स्वतः बच्चू कडू आले होते. दिव्यांगांच्या प्रश्नावरती आयुक्त आणि बच्चू कडू यांच्यात चर्चा चालू असताना वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी आयुक्तांवर हात उगारण्याचा प्रयत्न केला होता. याच आंदोलनानंतर बच्चू कडू यांच्यावरती नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात महापालिका प्रशासनाकडून तक्रार देण्यात आली होती आणि त्यानंतर २०१७ पासून नाशिकच्या सत्र न्यायालय सुनावणी सुरू होती. त्या सुनावणीवर आज निकाल लागला.

Comments
Add Comment

Pune – Sugar Factories : पुणे - साखर कारखान्यांकडे ४८९८ कोटी एफआरपी थकीत

पुणे : यंदाचा २०२५ -२६ चा ऊस गाळप हंगाम आता जवळपास संपला असून मोजकेच १० ते १२ कारखाने अद्याप सुरु आहेत. तरीसुध्दा

SBL Energy Blast : कंपनीचे मालक अजूनही ‘आऊट ऑफ रिच’

महिनाभरात तब्बल २६ कामगारांचा तडफडून मृत्यू नागपूर : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी

चंद्रपूर जिल्ह्यासाठी १ व ३ एप्रिल रोजी येलो तर २ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी

चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक १ व ३ एप्रिल

Dadar-Bhusaval Express : खान्देशी प्रवाशांसाठी आनंदवार्ता! दादर–भुसावळ एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार

मुंबई : जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात 'नंबर २'; कोकणच्या कोळंबीचा रुबाब सातासमुद्रापार!

मुंबई : भारताच्या नीलक्रांतीमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, मत्स्य

मुंबईसह ठाणे लोकसभेची खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर जबाबदारी; शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे