मुंबई : विधीमंडळाचा ‘चोरमंडळ’ असा उल्लेख करणा-या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत एकेरी भाषेत सडकून टीका केली.
संजय राऊत सारख्या नालायक माणसाकडून दुसरी कोणतीही अपेक्षा नाही. हे विधिमंडळ नसते तर तो खासदार पण झाला नसता. थोडी जरी लाज राहिली असेल तर त्याने खासदारकीचा राजीनामा द्यावा. चौकाचौकात त्याची धिंड काढली पाहिजे. संजय राऊतला आमच्या हवाले करा, जेणेकरून त्याची धिंड काढू शकतो. संजय राऊत याच्यावर कायदेशीर प्रक्रिया झालीच पाहिजे, संजय राऊतची सरकारने सुरक्षा काढावी, अशी मागणी नितेश राणे यांनी विधानसभेत केली.
संजय राऊतचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे. तो सामनात येण्याआधी त्याचे सर्व लेख शिवसेनेच्या विरोधात होते. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचे पटत नाही, असे संजय राऊतने लिहिले होते. राऊतांना दिलेले संरक्षण काढा. ते पोलिसांचे संरक्षण घेऊन फिरतात. ते सरकारने दिलेले संरक्षण आहे,” असे नितेश राणे यांनी म्हटले.
तसेच आपल्याला रोज सकाळी संजय राऊतचे ऐकावे लागते. महाराष्ट्राला याची गरज आहे का? असा सवालही नितेश राणे यांनी केला.
त्याचे मार्मिकमध्ये छापलेले कार्टून बघा. देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असे छापू शकतात का? त्यांना शिव्या देऊ शकतात का? संजय राऊतांचे १० मिनिटे संरक्षण काढायला सांगा, ते उद्या सकाळी परत दिसणार नाही, एवढा शब्द देतो,” असे वक्तव्य राणेंनी केले.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…