Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीमहत्वाची बातमी

हेमंत रासने यांनी बजावला मतदानाचा हक्क

हेमंत रासने यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे: आज कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु असलेल्या मतदानात कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या पोटनिवडणुकीसाठी अनेक तरुण मंडळी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.


चिंचवडमध्ये तिरंगी लढत होतेय तर कसबामध्ये दुहेरी लढत होतेय. कसबा मतदार संघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडणूक लढवताहेत. तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होतेय.


चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तेथून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे निवडणूक लढवत आहेत. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत.


दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मुलांनीही पहिल्यांदाच मतदान केलंय. त्यांनी माझं पहिलं मतदान हे वडिलांसाठीच असेल असं कायम वाटायचं पण वडिल अचानक आम्हाला सगळ्यांना सोडून गेल्यामुळं त्यांच्या जागेवर आज आईला खंबीर लढावं लागतंय, या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Comments
Add Comment