जळगाव : ठाकरे गटाकडून सतत शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जातो. यावरून, शिंदे गटातील आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळते. आता तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना, होय आम्ही गद्दारी केली, पण एकनाथ शिंदेंसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावा यासाठी, असे म्हणत गुलाबराव पाटलांनी कबुली दिली आहे. एकनाथ शिंदे मराठा आहे, त्यांच्यासाठी मी हा त्याग केला, गद्दारी केली, असे गुलाबराव म्हणाले. आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो, यातच मतदारसंघाचा जयजयकार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
गुलाबराव पाटील गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, असे मंत्री गुलाबराव पाटील यांचे म्हणणे आहे.
जळगावातील बिलखेडा गावात विविध विकासकामं आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी पाटील यांनी विरोधकांच्या गद्दारीच्या आरोपावर थेट कबुलीच दिली. विरोधाला विरोध करायचा पण मतदार संघात काही काम करायचे नाही. बिलखेडेत साधी एक मुतारी हे लोक बांधू शकले नाहीत आणि भाषणं ठोकतात, असा जोरदार हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला.
“तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली”, असे म्हणत गद्दार म्हणून टीका करणाऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…