संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार, बीडमध्ये गुन्हा दाखल

बीड: खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.


कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील राजा ठाकूर यांना माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.


संजय राऊतांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत असताना, शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. आज राऊत यांच्या फोटोला चप्पल मारली आहे. त्यांनी असेच आरोप केले तर महिला सेनेला त्यांच्या घरात घुसायला वेळ लागणार नाही, असा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे. तसेच राऊतांनी सांभाळून बोलावे, असा सल्ला म्हात्रे यांनी दिला आहे.



'संजय राऊतांना स्किझोफ्रेनिया'


मला त्यांची खूप काळजी वाटते. त्यांना स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार झाला आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर टोलेबाजी केली आहे.

Comments
Add Comment

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘वंदे भारत’च्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या सविस्तर

पुणे: सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतील अनेक

विवाहासाठी दिव्यांगांना आता मिळणार अडीच लाख रुपये, राज्य सरकारचा मोठा निर्णय

सोलापूर : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी, दिव्यांग आत्मनिर्भर बनावा, विवाहापासून

निकालाआधी अनगरमध्ये भाजपने उधळला गुलाल! पहिल्यांदाच निवडणूक आणि बिनविरोध निवड

सोलापूर : सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असली तरी ही निवडणूक

पुणे-महाबळेश्वर ई-शिवाई बस सुरू

पुणे : स्वारगेट आगारातर्फे महाबळेश्वरसाठी वातानुकूलित ई-शिवाई बस सेवा सुरू केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला अपघात

अमरावती : अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतले आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला

Crime News : जमिनीचा तुकडा की रक्ताचा सडा? अर्ध्या गुंठ्यासाठी पोटच्या गोळ्याने जन्मदात्यांचे डोके ठेचले; हुपरी हादरली! सैतानी क्रूरता

हुपरी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात एका माथेफिरू मुलाने केवळ मालमत्तेच्या वादातून आपल्या वृद्ध