Thursday, April 16, 2026

प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

पुणे: भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती आणि माजी आमदार देवीसिंह शेखावत यांचं पुण्यात निधन झालं. सकाळी ९.३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

देवीसिंग शेखावत गेल्या दोन दिवसांपासून आजारी होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे पुण्यात केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावत चालली होती. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आज (शुक्रवारी) सायंकाळी ६ वाजता पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >