मुंबई (प्रतिनिधी) : अजित पवार फक्त भावी मुख्यमंत्री बॅनरच्या स्पर्धेत अडकले आहेत, अशी उपरोधित टीका आमदार नितेश राणे यांची अजित पवार यांच्यावर केली आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत जोरदार हल्लाबोल केला असून अजित पवार फक्त भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसताय, तुमचा आवडता टिल्लू असे म्हटले आहे. गेल्या वेळी बिचारा… एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला तर बस या वेळी माझा मित्र ‘पार्थ’ला निवडून आणा…असे म्हणत नितेश राणेंनी अजित पवारांना खोचक टोलाही लगावला आहे
आमदार नितेश राणे यांची अजित पवारांवर उपरोधिक टीका
- ‘अजित पवार मोठे नेते… पण वाचल्याशिवाय जमतच नाही बघा… राष्ट्रवादीच्या scriptwriter मित्रांनी जरा योग्य माहिती “लिहून” दिली पाहिजे. राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले.
- शाम सावंत सोडून माहिती असुदे दादा. बस या वेळी माझा मित्र पार्थला निवडून आणा. गेल्या वेळी बिचारा. एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला. म्हणून ते काही होते का बघा.
- राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. आपण काय फक्त भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात… तुमचा आवडता टिल्लू असे दोन ट्वीट आमदार नितेश राणेंनी केले आहे.
- दरम्यान, अजित पवारांनी औरंगजेब प्रकरणी वक्तव्य केल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर याआधी टीकास्त्र डागले होते.
- तुमची श्रद्धा औरंगजेबावर आहे असे राणेंनी पवारांना उद्देशून म्हटले होते.