दोन दगडावर पाय ठेवलेले 'ते' २ खासदार कोण?

मुंबई : ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपल्या बाजूने ६ खासदार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात ४ खासदारांचीच शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शपथपत्र न देणारे ते दोन खासदार कोण? असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. राज्यसभेतल्या तीनही खासदारांनी शपथपत्र दिले असेल तर मग शपथपत्र न देणारे दोन खासदार लोकसभेतीलच होते का? असे तर्कवितर्क आता लढवले जात आहेत. या दोन खासदारांचा कोणाला पाठींबा द्यायचे याचा निर्णय पक्का झाला नव्हता का? तळ्यात की मळ्यात अशा द्विधा मनस्थितीत दोन दगडावर पाय ठेवलेले 'ते' २ खासदार कोण? यायीच चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.


केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या आकडेवारीच्या आधारे धनुष्यबाणासंदर्भात निर्णय सुनावला, त्या आकडेवारीत असे नमूद करण्यात आले आहे की, लोकसभेतील एकूण १९ खासदारांपैकी १३ खासदार शिंदे गटाच्या बाजूने होते. त्यांची शपथपत्र शिंदे गटाकडून निवडणूक आयोगात सादर करण्यात आली आहेत. तर ठाकरे गटाच्या बाजूने लोकसभेचे सहा खासदार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र लोकसभेतील केवळ चारच खासदारांची शपथपत्र निवडणूक आयोगासमोर सादर झाली आहेत. राज्यसभेत शिवसेनेचे तीन खासदार असून त्या तीनही खासदारांची शपथपत्र ठाकरे गटाकडून सादर करण्यात आली आहेत.


राज्यसभा आणि लोकसभा मिळून एकूण नऊ खासदार आपल्या बाजूने असल्याचा दावा ठाकरे गटाने केलेला असला तरी प्रत्यक्षात मात्र ठाकरे गटाकडून केवळ सातच शपथपत्र निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाचा निकाल सांगतो. त्यामुळे ठाकरे गटाकडून कोणत्या दोन लोकसभा खासदारांची शपथपत्र सादर झालेली नाहीत? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे.

Comments
Add Comment

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील