स्टार प्रवाहवर १८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. महाराष्ट्रभरातले ४ ते १४ वयोगटातील एकापेक्षा एक स्पर्धक आपलं टॅलेंट या मंचावर दाखवणार आहेत. ग्रुप डान्स, सोलो डान्स, ड्युएट आणि ट्रायो असे नृत्याचे अनोखे प्रकार या मंचावर पाहायला मिळतील. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाच्या सुपर जजची जबाबदारी पार पडणार आहे, अभिनेता अंकुश चौधरी. तर समृद्धी केळकर आणि चिमुकली साईशा साळवी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.
मराठी सिनेमांमध्ये आपल्या जबरदस्त नृत्यदिग्दर्शनाने वेगळी ओळख निर्माण करणारी सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि हिंदी-मराठी रिअॅलिटी शो गाजवणारा नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे या कार्यक्रमाचे कॅप्टन आहेत. या ग्रॅण्ड रिअॅलिटी शोविषयी सांगताना अंकुश म्हणाला, ‘महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली बच्चेकंपनी आपल्या टॅलेण्टने मंचावर आग लावणार आहे. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की, प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा हा कार्यक्रम नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. त्यामुळे मी या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे. समृद्धी म्हणाली, ‘मला सूत्रसंचलनाची आवड होती. मात्र संधी मिळाली नव्हती. जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाच्या निमित्ताने ही संधी चालून आली. मला हा नवा प्रयोग करताना अतिशय आनंद होत आहे. हे पर्व ज्युनियर्सचं अर्थातच ४ ते १४ या वयोगटातल्या चिमुकल्यांचं आहे. त्यामुळे या बच्चेकंपनीला सांभाळत मला सूत्रसंचालन करायचं आहे.’
मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाविषयी सांगताना फुलवा म्हणाली, ‘महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत जोडली जातेय याचा प्रचंड आनंद आहे. खूप वर्षांनंतर पुन्हा एकदा जजची भूमिका पार पाडणार आहे, त्यामुळे उत्सुकता आहे.’ या कार्यक्रमाविषयी सांगताना वैभव घुगे म्हणाला, ‘हे पर्व लहान मुलांचं आहे. मला लहान मुलांसोबत काम करायला खूप आवडतं. कारण या मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी भरभरून असते. ही चिमुरडी मुलं मनापासून स्वप्न पाहतात. त्यांच्या मनात इर्ष्या नसते. त्यांना फक्त स्वप्नांचा पाठलाग करायचा असतो. या कार्यक्रमात ४ ते १४ वयोगटातील मुलं या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…