जय भोलेनाथ, हर हर महादेव, ओम नम: शिवायच्या जयजयकारात देशभरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
शिवलिंगावर दुधाचा अभिषेक घालण्यासाठी भाविकांनी देशभरात ठिकठिकाणच्या शिवमदिरात प्रचंड गर्दी केली आहे.
जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून कोलकात्यापर्यंत सर्वत्र उत्साहात महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे.
महाशिवरात्रीनिमित्त औरंगाबादमधील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वराच्या मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथेही लाखो शिवभक्तांनी दर्शनासाठी पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे.
नाशिक येथे हजारो भक्तांनी गोदावरी नदीत पवित्र स्नान करुन कपालेश्वराचे दर्शन घेतले.
दर्शन सुलभ व्हावे आणि मंदिर सुरक्षेसाठी पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. महत्त्वाच्या आणि प्रचंड गर्दी असणा-या मंदिरामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…